vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

रायगड, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकारणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांच्या थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.

दि.22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि अधिकाधिक नागरिकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड, अलिबाग ए. एस. राजदेकर यांनी केले आहे.००००००

संबंधित पोस्ट

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

राज्य विधानसभा पोटनिवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊बारामती (महाराष्ट्र) – 31.91% राहुरी (महाराष्ट्र) – 29.67%दुपारपर्यंत मतदान

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

विशेष परिसंवाद : सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद!न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्थेवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा! – अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना;एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन