vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पूर्वतयारी बैठकआरोग्य, स्वच्छता, सुरक्षा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पूर्वतयारी बैठकआरोग्य, स्वच्छता, सुरक्षा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- वेरूळ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांची गर्दी होईल. येणाऱ्या सर्व भाविकांना आरोग्य, सुरक्षा, पाणी, आणि वाहतूक व्यवस्था प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वेरूळ येथे महाशिवरात्र उत्सव पूर्वतयारी बैठकीत दिले.

  महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व कालावधीच्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठकीचे आयोजन आज वेरुळ येथे करण्यात आले. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, प्रादेशिक सहायक परिवहन अधिकारी मनीष दौंड, खुलताबाद तहसिलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी सुरज चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, महावितरण, कार्यकारी अभियंता, अन्न औषध प्रशासन, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक, सार्वजनिक बांधकाम विभाग, घृष्णेश्वर मंदिराचे विश्वस्त व सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

 बैठकीत निर्देश देण्यात आले की, महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे येणाऱ्या भाविकांसाठी बसेस एस. टी. महामंडळाने उपलब्ध करून द्याव्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेरूळ ते खुलताबाद या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावे. रस्त्यावर सुरक्षितता व वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे. मंदिर व्यवस्थापनाने जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि स्तनदा माता व दिव्यांग यासाठी दर्शन रांगेत विशेष प्राधान्य देऊन वेगळी व्यवस्था करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

मंदिर व्यवस्थापन, ग्रामपंचायत यांनी भाविकांची जादा संख्या पाहता मंदिर परिसरात स्वयंसेवकांची संख्या वाढवावी. परिसरात स्वच्छता ठेवावी. वाढते तापमान व उन्हाचे प्रमाण पाहता पाण्याची उपलब्धता तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास डॉक्टर, नर्सेस आणि आवश्यक बेडची उपलब्धता आरोग्य विभागाने करून ठेवावी. गर्दीचे योग्य नियोजन करून अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनास स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

 महाशिवरात्र महोत्सव कालावधीत वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. अग्निशामक दलाची वाहने उपलब्ध ठेवावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने मंदिर परिसरात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करून प्रसाद व इतर माध्यमातून अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी अतिरिक्त पथक नेमून तपासणी करावी. स्थानिक प्रशासन आणि वेरूळ घृष्णेश्वर मंदिर विश्वस्त व सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रशासनाल सहकार्य करावे व प्रशासनाने आपली जबाबदारी चोखपणे बजावून येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी. आरोग्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा बैठकीत दिले.०००००

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम’सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे’ – मुख्यमंत्री

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta