vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोफत हेल्मेट वाटप

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोफत हेल्मेट वाटप

 

        सांगली, प्रतिनिधी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांच्या आयोजनामधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. समारंभाचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, मोटर वाहन निरीक्षक सागर भोसले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सतिश भोसले आदि उपस्थित होते.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी हेल्मेट परिधानाबाबतचे फायदे व प्रात्यक्षिक दाखवले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी रस्ता सुरक्षेबाबतच्या सर्व नियम व अटी पाळण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले.

 वैद्यकीय शिक्षण विभागाकडील अधिपरिचारिका, परिचारिका, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट वाटपाचा लाभ मिळाला.

  भगीरथ सुझुकी, सांगली संस्थेचे मालक दीपककुमार पाटील यांनी 150 हेल्मेट अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता उपलब्ध करुन दिले. श्री. पाटील यांचा 1000 हेल्मेट वाटपाचा संकल्प असून 26 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता.  या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.00000

संबंधित पोस्ट

निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम, प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही- उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे- विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व 73 आक्षेप नामंजूर 

vishwatmaklokswamivarta

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी,बैठकीत सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व ॲग्री-स्टॅक नोंदणी तातडीने करण्याचे आवाहनजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

महाज्योती मधील संशोधक विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध होताच शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम दिली जाईल- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

त्रि-स्तरीय पंचायत राज संस्थांच्या लोकप्रतिनिधींचे जिल्हास्तरीय ‘पंच संमेलन’विकसित भारत रोजगार आणि उपजिवीका हमी अभियानाद्वारे,गावचा शाश्वत विकास साधावा- रोहयो मंत्री भरत गोगावले,गावाच्या विकासाचा प्राधान्यक्रम ठरवा- पालकमंत्री शिरसाट..