vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत-सांगलीत स्वयंरोजगार मेळावा संपन्न

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत-सांगलीत स्वयंरोजगार मेळावा संपन्न

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हा उद्योग केंद्र सांगली व टेलर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार मेळावा उद्योग भवन सभागृह येथे संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम चालू करणे तसेच व्यवसाय वाढीसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास टेलर असोसिएशनचे बसवराज पाटील, शहाबाद जारे, शशिकांत कोपर्डे यांच्यासह टेलर वेल्फेअर असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रम प्रसंगी सर्वांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत इच्छुकांचे अर्ज जिल्हा उद्योग केंद्रातर्फे निःशुल्क भरून घेण्यात आले.00000

संबंधित पोस्ट

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

vishwatmaklokswamivarta

गोशाळेला अनुदान मिळण्यासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

✨ इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, बुलढाणा ✨

लातूर येथे १० एप्रिल रोजी ‘मार्जिन मनी’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा…

vishwatmaklokswamivarta

केटरिंग व्यावसायिकांमध्ये जनजागृती;अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम