vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या ‘स्वराज्य सप्ताह’ या उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या ‘स्वराज्य सप्ताह’ या उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात..

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या ‘स्वराज्य सप्ताह’ या उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. आज दादरच्या शिवाजी पार्क परिसरात भव्य शिवसन्मान शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. श्री. प्रफुल पटेल साहब, पक्षाचे जेष्ठ नेते श्री. छगन भुजबळ साहब आणि मा. आ.श्री. नवाब मलिक साहब, श्री. शिवाजीराव गर्जे साहब व मुंबई कार्यध्यक्ष सिद्धार्थ टी. कांबले साहब यांच्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व हजारो शिवप्रेमी प्रचंड उत्साहाने सहभागी झाले होते.

यावेळी खा. श्री. प्रफुल पटेल साहब, श्री. छगन भुजबळ साहब आणि मा. आ.श्री. नवाब मलिक साहब व मुंबई कार्यध्यक्ष सिद्धार्थ टी.कांबले साहब यांनी शिवाजी पार्क परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला वंदन करुन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्तांची याठिकाणी उपस्थिती होती. अशी माहिती मो.इस्तियाक खान-मुंबई महासचिव तालुका निरीक्षक-सायन कोलीवाड़ा यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली

संबंधित पोस्ट

दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

स्मार्ट गव्हर्नन्स व आदिवासी सशक्तीकरण या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठीकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार- कोकण महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीकोंकण विभागीय आयुक्त कार्यालय व विजयभूमी विद्यापीठ यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार