vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल पुस्तकाचे प्रदर्शन…

अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल पुस्तकाचे प्रदर्शन…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी– येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथनगरीतील ९४ क्रमांकाच्या स्टॉलवर होणारी दर्दी साहित्यरसिकांची गर्दी गेले दोन दिवस लक्षवेधी ठरते आहे. पत्रकार संघाने महाराष्ट्राबाहेर प्रथमच सदस्य पत्रकारांच्या पुस्तकांचे प्रदर्शन या खास स्टॉलवर आयोजित केले आहे. एका प्रकारे गेल्या कित्येक वर्षातील विविध क्षेत्रांतील स्पंदने टिपणारे हे सामाजिक-सांस्कृतिक संचित, दस्तावेजीकरणच येथे पत्रकार संघाच्या पुढाकाराने साहित्य संमेलनात मांडले गेले आहे, अशी प्रशंसा या स्टॉलला भेट देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, सरहद चे संजय नाहर, दर महिन्याला आवर्जून पुस्तकांची खरेदी करणारे नांदेडचे माजी आमदार गंगाधर पटणे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, प्रवीण बर्दापूरकर, जयदेव डोळे, भाऊ तोरसेकर यांच्यासह अनेक नामवंतांनी केली.

पत्रकार संघाच्या ९४ क्रमांकाच्या या स्टॉलवर प्रदर्शित केलेली पुस्तकांमधून पत्रकारांच्या तब्बल चार पिढ्या वाचकांसमोर आल्या आहेत. येथील दुर्मीळ पुस्तके पाहाण्यासाठी गेले दोन दिवस झुंबड उडाली आहे. आज रविवारी संमेलनाचा समारोप आहे. तोपर्यंत हा अनमोल ठेवा साहित्यप्रेमींना न्याहाळता येईल, पाहाता येईल.

या स्टॉलला भेट देऊन पत्रकार संघाच्या या अनोख्या उपक्रमाची वाखाणणी करणाऱ्या नामवंतांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, संजय आवटे, पराग करंदीकर, तुळशीदास भोईटे, मुकुंद कुळे, नितीन सप्रे, यमाजी मालकर, प्रसन्न जोशी, सागरिका घोष, संदीप राजगोळकर, शिवाजी काळे, दिलिप साळुंके, पत्रकार कवी मंगेश विश्वासराव, राजेश जोष्टे, मुकुल आव्हाड आदींचा समावेश होता. तसेच, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे डायरेक्टर महेश अय्यंगार, स्टोरीटेलचे संतोष देशपांडे, निवेदक मिलिंद कुलकर्णी रामदास आठवले यांचे निकटवर्ती डॉ. राजेंद्र जाधव, विजय जाधव, काशीनाथ माटल, शिल्पा सुर्वे, मराठी व्यावसायिक बिल्डर असोसिएशनचे नितीन देशपांडे, दिल्लीतील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. विशाल जोगदंड, ऍड. चपळगावकर, रवीप्रकाश कुलकर्णी, रोहन नामजोशी यांनीही या स्टॉलला भेट दिली.

पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, या स्टॉलचे नियोजन आस्थेने सांभाळणारे अंतर्गत हिशोब तपासनीस हेमंत सामंत आणि सदस्य राजेंद्र साळसकर यांनी स्टॉलला सदिच्छा भेट देणाऱ्या नामवंतांचे स्वागत केले. या वेळी पाहुण्यांना पत्रकार संघाकडून पसायदान कोरलेली काष्ठपत्रांची मालिका भेट देण्यात आली.

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विशेष मोहिमांना गती

माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांची अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहास सदिच्छा भेट..

vishwatmaklokswamivarta

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार- उद्योगमंत्री उदय सामंत· महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम

बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन…