vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

देवमूर्तीच्या गट नं. 236 मध्ये आकडेवाले फुल; मीटरवाले गुल डीपीचा संपूर्ण खेळखंडोबा;एमएसईबीला निवेदन देऊनही फायदा नाही!

देवमूर्तीच्या गट नं. 236 मध्ये आकडेवाले फुल; मीटरवाले गुल डीपीचा संपूर्ण खेळखंडोबा;एमएसईबीला निवेदन देऊनही फायदा नाही!

जालना/प्रतिनिधी

येथील देवमूर्ती परिसरात येत असलेल्या मंठा रोडवरील साई हिल्स नामक कॉलनीमध्ये (गट नं. 236) गेल्या अनेक वर्षापासून एक डीपी असून सदर डीपीवर भार वाढल्याने ती केव्हाही जळू शकते. विशेष म्हणजे या ठिकाणी काहींचे आरो प्लॅट आहेत, पीठाच्या गिरण्या आहेत, घरगुती वापराचे कनेक्शन सुध्दा आहे परंतू हे सर्व कशावर चालते तर ते आकड्यांवर चालते. त्यामुळे सहाजिकच ज्यांच्याकडे अधिकृत मीटर आहेत, अशी मंडळी अडचणीत सापडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील मंठा रोडवर चौधरीनगरच्या पुढे असलेला भाग म्हणजे साई हिल्स् कॉलनी! या कॉलनीत जवळपास चाळीसहून अधिक कुटूंबे राहतात. या ठिकाणी जवळपास वीस मीटर आहेत. बहुतांशी लोक हे आकड्यांच्या वापर करतांना दिसून येतात. या संदर्भात एमएससीबीच्या कन्हैयानगर कार्यालयाला दोन वेळा निवेदन देण्यात आले परंतू त्याच्या काहीही फायदा झाला नाही. विविश म्हणजे 2020 मध्येच काही लोकांनी वर्गणी गोळा करुन डीपी आणली आणि पुढे चालून याठिकाणी रहिवांशांची संख्या सुध्दा वाढली. परंतू आता सदर डीपीवर लोड येवू लागला आहे.

या ठिकाणी एमएसईबीचा कोण लाईनमन आहे, तो केव्हा येतो आणि केव्हा जातो, हे देखील रहिवाशांना माहित नाही. येथील संपूर्ण कारभार हा रामभरोसे असाच आहे. वीजेची काही अडचण आल्यास ती वर्गणी गोळा करुनच खाजगी व्यक्तीमार्फत करुन घेण्यात येते. परंतू वारंवार पैसे द्यायलाही लोक कंटाळले आहेत.

मीटर घेऊन फायदा काय?

या कॉलनीतील लोक सरळ- सरळ म्हणतात की, आमचा मीटर घेऊन फायदा काय? केवळ एमएसईबीचे बील भरण्यासाठीच का? त्यापेक्षा ज्यांच्याकडे मीटर नाहीत, अशी मंडळीच बरे आहेत. कारण त्यांच्याकडे कोणी फिरकत नाही आणि बील भरण्याचीही कटकट नाही! काहींनी तर चक्क दुसर्‍याच्या नावावरील मीटर आपल्या घराला ठोकून दिले आहेत. तेथे फक्त मीटर आहे, एवढेच दिसते, बाकी सर्व अलबेल! खरा प्रश्न तो मीटरवाल्याचा! काहींची मानसिकता ही आता मीटर नको, अशीच होतांना दिसत आहे, त्यामुळे तेही बील भरायला धजत नाहीत!

दुहेरी अडचण!

मीटर चालकांची दुहेरी अडचण झाली आहे. एक तर मीटर घेतले हे चुकलेच! असेच मत अनेकांचे बनले आहे. तर दुसरीकडे प्रत्येक महिन्याला न चुकता बीलाचा भरणा करवा लागतो. अशा दुहेरी संकटात मीटरवाले सापडले आहेत.

यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे एमएसईबी! परंतू या कार्यालयातील अधिकारीही दिन जाव पगार आव या भुमीकेत वावरत असून त्यांना मस्तपैकी एसीची हवा मिळते. अशावेळी कुणी निवेदन दिले काय! कुणी विनंत्या केल्या काय! त्यांना काहीहीी देणे नाही, असेच ते वावतांना दिसतात.

—————————–

संबंधित पोस्ट

पालकमंत्र्यांनी घेतला अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर ग्रामीण भागातील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत*

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन