vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम 

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम

मुंबई प्रतिनिधी

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता छबीलदास रोड, धुरु हॉल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, कामगार नेते दिवाकर दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त’ या विषयावर ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे सुप्रसिद्ध भानुदास साटम यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून व अमेरिका, शिकागो, सिंगापूर येथून आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा तसेच “अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया” या लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चितळे बंधू उद्योगाचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्याशी ९३२३११७७०४ संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेट’ची सोय; उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

धारावीतील संत रोहिदास समाज बांधवांसह भगिनींचा होलिकोत्सव संपन्न..

vishwatmaklokswamivarta