vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेनेनिरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल परिक्षेत्रामध्ये .. राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानपाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज…

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेनेनिरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल परिक्षेत्रामध्ये .. राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानपाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज…

आध्यात्मिक वार्ता -जालना – परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कार योग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने 23 फेब्रुवारी 2025 ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसर्‍या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले आणि त्याबरोबरच निरंकारी मिशनच्या विशाल सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या अभियाना अंतर्गत जालना परिक्षेत्रातील संभाजी उद्यान (मोती बाग) या ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली. ज्यामध्ये माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर, महानगर पालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, राजेश राऊत, संध्याताई देठे, उदय शिंदे, जालना जिल्हा संयोजक राजकुमार पारसवाणी व किरण गरड, अनिल गुलडा आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आमदार खोतकर म्हणाले की, संत निरंकारी मंडळाचे कार्य कौतूकास्पद आहे, असे ते म्हणाले.

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले. पूर्वीप्रमाणेच याही वर्षी ‘चला सावरु, यमुना किनारे’ असा उद्घोष करत या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात आले.

27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 1650 पेक्षा अधिक ठिकाणी 10 लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले. हे दृश्य केवळ प्राकृतिक स्वच्छतेपर्यंत सीमित न राहता, अंतर्मनाला निर्मळ आणि पवित्र करण्यार्‍या एका आध्यात्मिक यात्रेचे सुंदर प्रतीक बनले. प्रत्येक श्रद्धाळु भक्ताची समर्पित उपस्थिती या गोष्टीचे प्रमाण होते, की जेव्हा प्रेम, सेवा आणि समरसतेचा दिव्य संगम होतो तेव्हा प्रकृतीही नवजीवनाचा अनुभव घेते.

सतगुरु माताजींनी पाण्याच्या महत्व अधोरेखित करताना समजावले, की पाणी अमृतासमान आहे जे प्रकृतीने आपल्याला सर्वोत्तम उपहाराच्या रुपात प्रदान केले आहे. त्याची स्वच्छता आणि संरक्षण ही केवळ एक जबाबदारीच नव्हे तर आमची स्वाभाविक सवय बनून गेली पाहिजे. बर्‍याचदा आपण अजाणतेपणे आपण वापरा व फेकून द्या अशा वस्तू व घाण जलस्रोतांमध्ये टाकून प्रदूषणात भर घालत असतो ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याच चिंतनातून प्रेरित होऊन ‘प्रोजेक्ट अमृत’ सारख्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे जी जल संरक्षण आणि स्वच्छतेच्या प्रति जागरुकता पसरविण्याचा एक महत्वपूर्ण प्रयास आहे.

बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिवसाला समर्पित असलेल्या या पवित्र सेवा अभियानात प्रत्येक भक्ताला जल संरक्षणाच्या दिशेने योगदान देण्याची संधी मिळाली. हा पुढाकार केवळ घाट आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेवर केंद्रीत नसून घरांमध्येही लहान-सहान सवयींतून जल बचतीला प्रोत्साहित करत आहे ज्यायोगे पाण्याचा आदर व्हावा आणि हे अमूल्य संसाधन भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहू शकेल

पर्यावरण सुरक्षें अंतर्गत जल संरक्षणामध्ये आपली सकारात्मक सक्रिय भूमिका निभावत ग्लोबल एनर्जी न्ड एन्व्हायरनमेंट फाउंडेशनने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला प्रतिष्ठित ‘वाटर कंजर्वेशन इनिशिएटिव एनजीओ ऑफ द ईयर 2025’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा गौरवपूर्ण सन्मान प्रोजेक्ट अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन आणि त्यातील विविध जल संरक्षण व स्वच्छतेसाठी घेतलेल्या पुढाकाराच्या प्रति अथक समर्पणाचे प्रतीक आहे. नि:संशय जल संसाधनांची शुद्धता आणि सतत संरक्षण करण्यामध्ये डछउऋ द्वारे केले जाणारे प्रयास समाजाला स्वच्छ, स्वस्थ आणि समृद्ध भविष्याकडे अग्रेसर होण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.——–

संबंधित पोस्ट

विशेष लेख-वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य —

50 दिवसांत दंडक्रम पारायण पूर्णः काशी नगरीत 200 वर्षांनी महाराष्ट्राने पुन्हा घडवला इतिहास; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

आत्मनिरीक्षणाचा दिव्य संद पसरवत ७८ वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न झाला.मुंबई आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी सहभाग घेतला.आत्मसुधारणेद्वारे जगात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण करा-निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

vishwatmaklokswamivarta

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

गुरुपौर्णिमे निमीत्त दत्त मंदीर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा…

vishwatmaklokswamivarta