vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करावी- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाईकोकण महसूल विभाग आढावा बैठक..

अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करावी- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाईकोकण महसूल विभाग आढावा बैठक..

मुंबई, प्रतिनिधी- राज्यातील खाणपट्ट्यांमधून होणारी अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनीकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणण्याचे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात कोकण महसूल विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, महासंचालक डॉ. जी. डी. कांबळे, उपसंचालक रोशन मेश्राम व कोकण विभागातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकारी उपस्थित होते.खनिजाची वाहतूक करताना खनिजे झाकलेली नसल्याने धूळ उडून प्रदूषण होते. शिवाय अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करून खाणीचे परवाने तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश श्री.देसाई यांनी यावेळी दिले. खाणींमधून खनिज तसेच गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी जेणेकरुन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे नियंत्रण जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर ठेवावे. या होणाऱ्या चोऱ्या रोखता येतील. तसेच राज्यभरातील खनिकर्म विभागाची यंत्रणा सर्वकंष दृष्टिकोनातून अद्यावत करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

 कोकण महसूल विभागात लिलावासाठी ज्या संस्थांनी खाणी उत्खननासाठी घेतल्या आहेत. त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा संबंधित संस्थेचा उत्खननाचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश खनीकर्म मंत्री श्री. देसाई यांनी दिले.0000

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी तीन टँकर मंजूर..

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर ठेवा* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा अत्यावश्यक असल्याशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये*