vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीला गती — जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने अंमलबजावणीचे आदेश

जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीला गती — जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने अंमलबजावणीचे आदेश

 

रायगड प्रतिनिधी– स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, या शासकीय धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या शासकीय इमारतीत अद्याप हिरकणी कक्ष सुरू करण्यात आलेला नाही तेथे हिरकणी कक्ष तात्काळ स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध कार्यालयात हिरकणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत
.शासकीय कार्यालये आणि सर्वच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारावेत हा 2012 सालचा शासन निर्णय. भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने याची शिफारस केली होती. यात 60X60 ची स्वतंत्र खोली स्तनपानासाठी असावी, तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पलंग- गादी, चांगले बेडशीट, तक्क्या- उशा, पंखा असावा, हिरकणी कक्षाच्या भिंतीवर स्तनपानाचे महत्त्व आणि शिशुपोषणाच्या शिफारशी इ.ची सचित्र माहिती असावी, अश्या शिफारशी होत्या.
0000

संबंधित पोस्ट

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर उद्यान दि.२६ पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे- खा.संदिपान भुमरे

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय स्पर्धेत सर्वोच्च विजेता ठरला तेलंगणा संघ; अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांची सांगता

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम — दि. १२ ऑक्टोबर २०२५“दोन थेंब आयुष्याचे – प्रत्येक बालकासाठी सुरक्षित भविष्याचे”..

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार