vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बिटकॉइन घोटाळा- महाराष्ट्र सह देशभरात 6,800 कोटींप्रकरणी सीबीआयची देशभरात छापेमारी…

बिटकॉइन घोटाळा- महाराष्ट्र सह देशभरात 6,800 कोटींप्रकरणी सीबीआयची देशभर छापेमारी…

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणावर बिटकॉईन घोटाळ्याचे जाळे उघडकीस आले असून, तब्बल 6,800 कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली, बेंगळुरू आणि अन्य शहरांमध्ये सीबीआयने (CBI) छापेमारी केली आहे. या कारवाईत बिटकॉईन घोटाळ्यातील अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांची माहिती

26बिटकॉईन घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार सध्या दुबईत राहत असून, त्याच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण आर्थिक फसवणुकीचा प्रकार चालवला जात होता. बिटकॉईन व्यवहाराच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो लोकांची फसवणूक करण्यात आली. तपास यंत्रणांच्या अहवालानुसार, 9 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी या स्कीममध्ये आपली गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाली असून, अनेक पीडित गुंतवणूकदारांना आपला पैसा गमवावा लागला आहे

बिटकॉईन व्यवहाराच्या आडोशाखाली ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठा घोटाळा करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. यामध्ये अनेक बनावट कंपन्या आणि खात्यांद्वारे पैशांची अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणांनी सुमारे ₹500 कोटींची मालमत्ता गोठवली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

प्रकरणातील आरोपींनी राजकीय संपर्कांचा फायदा घेतल्याचा संशय असून, काही प्रभावशाली व्यक्तींची नावे तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सीबीआयने (CBI) अनेक बँक खाते, मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील जप्त केला आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 जम्मू आमि काश्मीरपासून महाराष्ट्र आणि दिल्लीपासून पश्चिम बंगालपर्यंत संपूर्ण देशात ठिकठिकाणी कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. क्रिप्टोचलन घोटाळ्यातील गुंतागुंत आणि व्याप्ती मोठी आहे. या घोटाळ्याचे आंतरराष्ट्रीय परिणामदेखील होऊ शकतात, हे पाहून सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण तपासाठी सीबीआयकडं सोपविलं आहे.महत्त्वाचे डिजीटल पुरावे जप्त-सीबीआय प्रवक्त्याच्या माहितीनुसार घोटाळ्यातील संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी आणि सर्व आरोपींची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. तसेच घोटाळ्याती आंतरराष्ट्रीय व्यवहार तपासण्यात येणार आहेत. तपासणीदरम्यान काही क्रिप्टो वॉलेट, डिजीटल पुरावे आणि काही डिजीटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तसेच ई-मेल आणि क्लाउडमध्ये असलेले पुरावेदेखील जप्त करण्यात आल्याचं सीबीआयच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

संबंधित पोस्ट

मुंबईत सीएसटी त बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांनी दोघांना केली अटक.

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष  – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर

G20 अध्यक्ष पदाचा पदभार सांभाळल्या नंतर आज पार पडणार पहिली सर्वपक्षिय बैठक

vishwatmaklokswamivarta

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

200 कोटींच्या खंडणीतील आरोपीसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचा सेल्फी, चर्चांना उधाण

vishwatmaklokswamivarta