vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार..  

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार..

 

चिखली : प्रतिनिधी- वडिलांच्या कष्टाची शेती मुलं सुनानी लाडीगूलाबी लावून बक्षीस पत्र करून घेतली उर्वरित शेती विकून मुलींनी सुद्धा पैसे काढून घेतमारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याने पोलीस व पत्रकार यांनी सदर वृद्धाला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करून माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली आहे.

 ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना बोलावून सदर आजोबांची हकीकत सांगून पोलीस स्टेशन रायपूर चे ए एस आय अमोल घाटे, संजय चवरे, पत्रकार गणेश अंभोरे व अकील अहमद यांच्या शिफारशी वरून क्षणाचा हि विलंब न करता वृद्धाश्रम च्या नियमानुसार प्रवेश अर्ज भरून त्या निराधार बेघर आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय मिळून दिला आहे. वृद्ध आजोबा ना वृद्धाश्रमात आश्रय दिल्याने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ७५ हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत…

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर,बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार,बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता – मंत्री ॲड.आशिष शेलार