vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देशस्थानिक बातम्या

रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांचा मुंबई दौरा संपन्न, भारत देशात समाजसेवेसाठी अनेक संधी…

रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांचा मुंबई दौरा संपन्न, भारत देशात समाजसेवेसाठी अनेक संधी…

 

मुंबई प्रतिनिधी-  मुंबई- रोटरी इंटरनॅशनचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांनी मुंबईला येऊन मुंबई रोटरी क्लबचे गव्हर्नर व पदाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांनी विविध कार्यक्रम आणि प्रकल्पांमध्ये आपला सहभाग नोंदविला. संगकू युन हे समाजसेवा आणि जागतिक सहभागासाठी ओळखले जाणारे दूरदर्शी नेते आहे.राजन दुआ हे 2026-27 मध्ये रोटरी मुंबई जिल्हा 3141 चे गव्हर्नर धुरा समर्थपणे सांभाळतील. ते समुदाय विकासातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि दृढ नेतृत्वासाठी देखील प्रसिद्ध आहेत.

रोटरी इंटरनॅशनल एक जागतिक मानवतावादी संस्था असून ही शांतता, सद्भावना आणि शाश्वत समाजविकासाला प्रोत्साहन देणारी जागतिक स्वयंसेवी संस्था आहे.रोटरीचे प्रमुख प्रकल्प जसे की,पोलिओ निर्मूलन आणि लसीकरण मोहिमा,शुद्ध पाणी आणि स्वच्छता उपक्रम,शिक्षण आणि युवक सशक्तीकरण शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि नेतृत्व विकास कार्यक्रमांना समर्थन, तसेच आपत्ती निवारण आणि समाज पुनर्बांधणी करणे हे गरजेचे आहे.

      रोटरी क्लबने आतापर्यंत बालरोग हृदय शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलिसिस, कर्करोग उपचार, रक्तदान शिबिरे आणि अन्य वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.रोटरी सरकारला समाजविकासासाठी त्यांच्या सततच्या योगदानाची दखल घेण्याचे आणि समर्थन करण्याचे आवाहन करते. आणि धोरणात्मक पाठिंबा, वाढीव निधी आणि धोरणात्मक सहकार्याची अपेक्षा करते. ज्यामुळे उपक्रमांचा प्रभाव आणखी वाढवता येईल. त्यांच्या सहकार्याने आपण अधिक सक्षम, न्याय्य आणि समृद्ध समुदाय निर्माण करू शकतो. यावेळेस रोटरी इंटरनॅशनलचे नवनिर्वाचित सुप्रसिद्ध अध्यक्ष संगकू युन,

रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर राजू सुब्रमणियन, रोटरीचे माजी गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल, डॉ. सुमन अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळेस त्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन रोटरीचे गव्हर्नर राजन दुआ यांनी केले असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक – ८७७९ ७७७८४० असा आहे.

संबंधित पोस्ट

ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये घोषणा – जागतिक व्यावसायिक सहयोगासाठी प्रभावी मंच!

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

नवी मुंबई महानगरपालिकेची २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध, नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय : यंदा प्रथमच ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास मिळणार १०% अर्ली बर्ड सवलत; तसेच बिल वाटपासाठी बचत गटांच्या महिलांचा सहभाग

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे