
ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न
सातारा प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रे ता.जि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्यातील उसतोड कामगारांविषयीच्या योजना जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा श्रीमती. निना बेदरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कृषी अधिकारी विलास पाटील यांनी उसतोड कामगारांच्या योजनांविषयी माहिती दिली तसेच ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत याबाबत माहिती दिली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जिवाजी मोहिते यांनी साखर कारखान्यातील उसतोड कामगारांच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. अॅड. यश गोडखिंडी, लोक अभिरक्षक कार्यालय यांनी आभार प्रदर्शन केले.
0000



