vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात दशसूत्री हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येत आहे. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य वाढीस लागतांना दिसत आहेत. याचा प्रत्यय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच आला. जंगला तांडा या सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव तालुक्याच्या भेटीवर असतांना अचानक जंगला तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसिलदार मनिषा मेने, गटविकास अधिकारी डी.एस. अहिरे, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, केंद्रप्रमुख फिरोज तडवी तसेच मुख्याध्यापक रामदास पुसे यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी शाळेतील दशसूत्री अंमबजावणीबाबत त्यांनी माहिती घेतली. त्याची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी हे इयत्ता दुसरीच्या वर्गात गेले. तेथे त्यांनी गणिताचा तास घेतला. काही गणिते विद्यार्थ्यांना सोडवावयास दिली. त्यावर अनेक प्रश्नही विद्यार्थ्यांना विचारले. या चुणचुणीत लहान मुलींनी त्यांना उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे गणिती कौशल्य वाढल्याचे दिसून आले. त्यासाठी शिक्षणाच्या अभिनव पद्धतीचा अवलंब शाळेत करण्यात येतो असे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शिक्षक व मुख्याध्यापकांचेही कौतुक केले. शाळेत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शालेय परिसरातील भौतिक सुविधा या सारख्या उपक्रमांचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी कौतुक केले.

०००००

संबंधित पोस्ट

पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश…!!

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

राज्यात बाल विवाहाचे प्रमाण पुढील पाच वर्षात-१० टक्क्याच्या आत आणण्याचे उद्दिष्ट-महिला व बाल विकास मंत्रीआदिती तटकरे

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान*जिल्ह्यात आचारसंहिता लागू