vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी 8 मार्च रोती जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरीता समूह गायन, समूह नृत्य, समूह नाटिका, महिला भजन तसेच मंगळागौर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धांचे आयोजन यावर्षीही करण्यात आले आहे व त्याच्या प्राथमिक फे-याही पूर्ण झालेल्या आहेत.

या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच उकृष्ट महिला लिंक वर्कर (8 विभागातून प्रत्येकी 01), विनावेतन समाजसेवा करणा-या समाजसेविका (नवी मुंबई कार्यक्षेत्रातून 01), उकृष्ट महिला सफाई कामगार (8 विभागातून प्रत्येकी 01), अपंग व दिव्यांगाकरिता उल्लेखनीय काम करणा-या महिला (नवी मुंबई कार्यक्षेत्रातून 01), उकृष्ट महिला पोलिस कर्मचारी (नवी मुंबई कार्यक्षेत्रातून 01), नमुंमपा शिक्षण मंडळातून उकृष्ट शिक्षिका (प्राथमिक शिक्षिका – 01 आणि माध्यमिक शिक्षिका 01) तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उदयोग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांना आणि स्वच्छता अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था / महिला मंडळ / महिला बचत गट यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात येणार आहे.

 अशाप्रकारे जागतिक महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये 8 मार्च 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, पुरस्कार वितरण व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

     तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त महिला / महिला मंडळे / महिला बचत गट यांनी दि. 08 मार्च 2025 रोजी, सकाळी 9.00 वा. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे जाहीर अवाहन नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

आज बारामती विधानसभा पोट निवडणूक2026- राज्याचे उपमुख्यमंत्री उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांनी जिल्हा  परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला…

मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी.मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार