vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संविधान दिनानिमित्त बुधवारी रॅली

संविधान दिनानिमित्त बुधवारी रॅली

  सांगली, प्रतिनिधी: संविधान दिनानिमित्त दि. 26 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संविधान रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बाळासाहेब कामत यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, संविधान दिनानिमित्त दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस. टी. स्टॅन्ड, परिसर सांगली पासून ही रॅली सुरू होऊन एस. टी. स्टँड सांगली मार्गापासून – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा – महानगरपालिका इमारत मार्ग – सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली येथे रॅलीची सांगता होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संविधानाची जागरूकता वाढविण्याकरिता संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सवी वर्षात “घर घर संविधान” हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय संविधानाची जागरूकता वाढविण्याकरिता दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त ही रॅली काढण्यात येणार आहे. तरी या दिवशी संविधान उद्देशिकेचे वाचन तसेच संविधान रॅलीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी सांगली एस. टी. स्टँड परिसरातील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी सकाळी 08.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

वनविभागाचे सौंदर्यीकरण,सशक्तीकरण आणि मजबुतीकरणावर विशेष भर– वनमंत्री गणेश नाईक

ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

महाराष्ट्र शासनाचे ५, १३ आणि २३ वर्षे मुदतीचे अनुक्रमे ८०० कोटी, १६०० कोटी व १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

जिल्ह्यात प्रगत टपाल तंत्रज्ञान (IT 2.0) प्रणाली ४ ऑगस्टपासूनकार्यान्वित होणार; देखभाल, दुरुस्तीसाठी २ ऑगस्ट रोजी सेवा स्थगित

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया !-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे• शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन