vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार – शाहूराज माने, अध्यक्ष जनसंघर्ष समिती

समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार – शाहूराज माने, अध्यक्ष जनसंघर्ष समिती

 

( सुरेश गायकवाड ) प्रतिनिधी

 

मुंबई – प्रतिनिधी -महाराष्ट्रातील 22 लाख गुंतवणूकदारांचे समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेले जवळपास ३७५० कोटी रुपये १० वर्षापासून मिळाले नाहीत. त्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे आणि ते पैसे परत न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

  यावेळेस शाहूराज माने यांनी सांगितले की, समृद्ध जीवनाचा मालक महेश मोतेवार यांच्या सर्व मालमला २ ऑगस्ट २०११ रोजी सरकारने ताब्यात घेण्यात येऊन लिक्वीडेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या सर्व मालमत्ता सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हवेली, पुणे यांची नियुक्ती करून सर्व मालमत्ता त्यांच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आल्या असे असताना एमपीआयडीच्या यादीमध्ये ताब्यात घेण्यात रॉल्स रायस कार wb 02 AB 0123 या क्रमांकाची गाडी प्रशांत कोरटकर यांच्याकडे कशी गेली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

   तसेच महेश मोतेवार ७ वर्षाचा कारावास भोगून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी दौलत प्राईड नावाने नवा फसवेगिरीचा व्यवसाय सुरू करून तुम्ही दौलत प्राईड मध्ये गुंतवणूक केली तसच समृद्धी जीवनची मॅच्युरिटी देण्यात येईल असे सांगून पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालत आहे. व समृद्ध जीवनच्या सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पुन्हा कब्जा करून त्या जमिनीचा अनाधिकृत पणे ताबा मिळवत आहे. या प्रकरणी आज ११ मार्च २०२५ रोजी आझाद मैदानावर हजारो गुंतवणूकदार आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान लोक चळवळ व्हावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta