vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पणजी येथे 20 मार्चला डाक अदालत..

पणजी येथे 20 मार्चला डाक अदालत..

        सांगली, प्रतिनिधी : भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत दि. 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्र पणजी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम दिनांक 12 मार्च आहे, असे प्रवर डाक अधिक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः मेल, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, बचत बँक खाते इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह 12 मार्च पर्यंत सहाय्यक निदेशक डाक सेवा, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी ४०३००१ यांचे नावे पाठवावेत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना;शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शहापुरात २७ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’विविध दाखले अन् महसुली सेवा एकाच छताखाली मिळणार

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना-ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला कंटेनर ची जोरदार धडक दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू

एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट: *नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta