vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई, प्रतिनिधी: गडचिरोली जिल्ह्यात अनियमित आणि निकृष्ट दर्जाच्या तांदूळ पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंदर्भात अहवाल मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून दोषींवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून तांदळाच्या पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली जाईल. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी महाराज जयंती;जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार अधिकृत ओळखपत्र

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

vishwatmaklokswamivarta

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला-सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग