vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या कुर्ला नेहस्नगरात एक नगर एक होळी…

मुंबईच्या कुर्ला नेहस्नगरात एक नगर एक होळी…

मुंबई( प्रतिनिधी )   मुंबई- कुर्ला पूर्व येथील नेहरुनगर या म्हाडाच्या वसाहतीमध्ये होळीचा उत्सव एकत्रितपणे साजरा व्हावा या दृष्टीने एक नगर एक होळी हा उपक्रम यंदाही करण्यात येणार आहे. यातून सर्व नागरिक एकत्र येतील तसेच पर्यावरणाची होणारी हानी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. गुरुवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता नेहरुनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ही होळी साजरी कऱण्यात येणार आहे.

   एक नगर एक होळी हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला असून त्याला स्थानिक रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही एक नगर एक होळी साजरी करण्यात येणार आहे. काही दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. होळीच्या दिवशी विविध इमारतींमध्ये होळी पेटविण्यात येते. त्यासाठी परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्या जातात, कधी कधी तर संपूर्ण झाडही तोडले जाते. मात्र अशी झाडांची कत्तल करण्यापेक्षा, वखारींमधून लाकडे आणून ती जाळून धूर वाढविण्यापेक्षा सर्वांनी एकत्र यावे आणि एकच होळी सर्व इमारतींमधील नागरिकांच्या सहकार्याने पेटवावी, असे आवाहन नेहरुनगरमधील काही तरुणांनी केले असून त्याला रहिवाशांनी पाठिंबा दिला आहे.

   जास्तीत जास्त होळ्या पेटविण्याऐवजी एकच सार्वजनिक होळी पेटवावी आणि पर्यावरणाचा होणारा –हास थांबवावा, हवेचे प्रदूषण रोखावे, तसेच होलिकोत्सव एकत्रित साजरा करून नगरातील एकोपा वाढावावा, असे आवाहन या तरुणांनी केले आहे.

 यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येत्या गुरुवारी, १३ मार्च रोजी .होलिकोत्सवानिमित्त रात्री ८ वाजता एकत्र सार्वजनिक होळी साजरी करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी हरीश खाडे (९८७०२१७९७९), प्रसाद मुळे (९८१९९५९८९२), उमेश शिरसाट (९८९२३८०६०७) आणि प्रसाद मोकाशी (९८६९०२०७२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

विकसीत भारत यंग लिडर डॉयलॉग क्विझ मध्ये युवक-युवतींसाठी ज्ञान, संधी आणि गौरवाचा मंच.

vishwatmaklokswamivarta

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 राखीव निकालाबाबत,सुनावणी दि.25 मार्च ते दि.04 एप्रिल 2025 पर्यंत