vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुष्ठरोग जनजागृतीसाठी विविध उपक्रमासह शिबीरांचे आयोजन

 कुष्ठरोग जनजागृतीसाठी विविध उपक्रमासह शिबीरांचे आयोजन

आरोग्य प्रतिनिधी

-जालना, :- शाश्वत विकास ध्येयाच्याअंतर्गत केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत शुन्य कुष्टरुग्ण प्रसार हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील लपलेले कुष्ठ रुग्ण शोधून त्यांना बहुविध उपचाराखाली आणणे आवश्यक आहे. तरी दि.18 ते 21 मार्च 2025 पर्यंत विविध उपक्रमासह शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली आहे.

कुष्ठरोगींचे डोळे, नाक, हात, पाय या अवयवांची शस्त्रक्रियापुर्व तपासणी करुन पुर्नरचनात्मक शस्त्रक्रीयेसाठी पात्र असणाऱ्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयातील नागरी कुष्ठरोग केंद्रात दि.18 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता तर दि.19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), जालना येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.20 मार्च रोजी जालना शहरातील सरस्वती भवन विद्यालय गांधी चमन येथून कुष्ठरोग जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार आहे तसेच अंबड रस्त्यावरील मत्स्योदरी विद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकृती असणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्य मेळावा जालना येथे दि.19 मार्च रोजी तर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दि.21 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी सहभाग नोंदवावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया

स्वैच्छिक रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ||

बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

मोफत वैद्यकीय उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी,आयुष्मान कार्ड आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी· ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta