पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरीता रायगड जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन..
रायगड प्रतिनिधी-रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांना विनंती करण्यात येते की जिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग व तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशन, तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.04 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10.0 ते दुपारी 02.00 या वेळेत तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशन, तळोजा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळावा आयोजित केला आहे. येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजन (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळावा आयोजित केला आहे.
तरी रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी उद्योजकांनी आपल्या आस्थापनेतील कुशल/अकुशल रिक्तपदे जास्तीत जास्त या कार्यालयास कळविणेत यावीत. शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्यातील जास्तीत-जास्त रिक्तपदे रोजगार मेळाव्यातून भरती करण्यात येणार आहे. याकरिता या विभागाचे संकेतस्थळावर https://rojgar.mahaswayam.gov.in नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त संकेतस्थळावर Employment Employer List a Job)- Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्ह्याच्या नावावरील View Details Job Details – Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील Save Vacancy वर क्लीक करावे. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment Employer(List a Job)-Registerया क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर उपरोक्तप्रमाणे आपलेकडील रिक्तपदे अधिसूचित करुन संकेतस्थळावर दिनांक 29/03/2025 पर्यंत अधिसूचित करावीत.
संकेतस्थळावर नवीन नोंदणी करणे व रिक्तपदे अधिसूचित करणे या संदर्भात आपणास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०२९ किंवा श्री महेश भा. वखरे, लिपिक-टंकलेखक यांचे ९४२१६१३७५७ या भ्रमनध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीम.अ. मु. पवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांनी केले आहे