vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे)- इ. स. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञाच्या परिषदेत मांडला व त्यास दि. २४ मार्च रोजी मान्यता मिळवली म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दुरीकरणाकरिता विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे कार्यालय अंतर्गत दि. २४ मार्च, २०२५ रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणुन निवड करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या निर्देशांकानुसार व सहसंचालक आरोग्य सेवा, क्षय व कुष्ठ पुणे यांचे मार्गदर्शक तत्वानुसार एकूण २८ रोप्य प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा पुतळा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच १२ निक्षय मित्र व ४ टीबी चॅम्पीयन यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

   याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्हातील एकूण ग्रामपंचायतीमधील 28 कास्य व 136 रोप्य मानांकन देऊन पुढील वर्षी उर्वरित सर्व ग्रामपंचायती ह्या लवकरच सिल्वर मधून सुवर्ण नामांकन प्राप्त करण्यास प्रयत्न करून ठाणे जिल्ह्यात क्षयरोग हद्दपार करूयात, असे आवाहन केले.  कार्यक्रम हा जिल्हा क्षयरोग केंद्र कार्यालय व जी. एल. आर. ए. इंडिया (जर्मन लेप्रसी एन्ड टी बी रिलीफ असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये एन. के. टी. माध्यमिक ज्युनिअर महाविद्यालयातील 250 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच नर्सिंग टी एन. के. टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीबी विषयक चित्रकला, रांगोळीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच टीबी जनजागृती करिता पथनाट्य नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या समोर सादर केला.   जागतिक क्षयरोग दिन नियोजन भवन सभागृह येथे संपन्न झाला असून नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींची क्षयरोग विषयी विविध जनजागृती रॅली आयोजित करून विद्यार्थी रॅली, पथनाट्य, ऑटो मायकिंग, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर असे विविध उमक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरु करण्यात आले असून कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आशा मुंजाळ यांनी केली.    केंद्र शासनाच्या टीबी मुक्त ग्रामपंचायत निर्देशांकानुसार निवड झालेल्या ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. अशोक नांदापूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, नगराध्यक्ष सुमती पाटील, नगरसेवक किरण भोईर, संत क्लरेट आश्रम बेंडशीळ ता.अंबरनाथ रामभाऊ पातकर, नगराध्यक्ष बदलापुर व निक्षय मित्र, तालुका आरोग्य अधिकारी सर्व, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, निक्षय मित्र, टीबी चॅम्पीयन तसेच कार्यक्षेत्रातील सर्व क्षयरोग कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी केले.

 

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम तंबाखूचे अतिसेवन म्हणजे अनंत आजारांना निमंत्रण राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम…

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन काढण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन

vishwatmaklokswamivarta

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा लाभ घ्या- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम- अभियानात दिनांक 20 सप्टेंबरअखेर 3 हजार 148 रूग्णांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta