vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्वच्छता ही सेवा’ अभियानात ईटीसी केंद्रामध्ये विशेष मुलांची दंत तपासणी

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात ईटीसी केंद्रामध्ये विशेष मुलांची दंत तपासणी

        नवी मुंबई प्रतिनिधी  नमुंमपा ईटीसी केंद्रामध्ये वेगवेगळया वयोगटातील मतिमंद, कर्णबधीर, स्वमग्न, अंध, अध्ययन अक्षम आणि बहुविकलांग मुले शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधांचा लाभ घेत असतात. ईटीसी केंद्रामार्फत या विशेष मुलांसाठी शिक्षण व थेरपीसोबत इतरही अनेक उपक्रम राबविले जातात.

  केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा अभियान 2025’ त्याचप्रमाणे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्र व डॉ.जी डी पोळ फाऊंडेशनचे वाय. एम. टी. डेंटल कॉलेज, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प स्नेह संस्थेच्या माध्यमातून ईटीसी केंद्रात दिव्यांग मुलांकरिता दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या दंत तपासणी शिबिराचा लाभ कर्णबधिर, मतिमंद बहुविकलांग आणि अंध अशा विविध दिव्यांग प्रवर्गातील एकूण 210 विशेष मुलांनी घेतला

   या शिबिराकरिता डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली श्रीम.साक्षी आमले आणि श्री.वरद भाटे यांच्या पुढाकार घेतला होता. या वेळी रेणू तायवाडे यांच्यासह वैद्याकिय समुहाने विशेष मुलांची दंत तपासणी केली व आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले

  सदर दंत तपासणी शिबीर आयुक्त श्री. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली केंद्राच्या संचालिका सहा.आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांनी या आरोग्य शिबीराचे आयोजन आपल्या सहका-यांसह नियोजनबध्द रितीने केले. शिबीराच्या आयोजन कामकाजावर कार्यालय अधिक्षक तसेच मतिमंद विभाग व कर्णबधीर विभाग यांच्या शैक्षणिक व्यवस्थापकांनी देखरेख व नियंत्रण केले

00000

संबंधित पोस्ट

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात प्रभावी लढाठाणे जिल्ह्यात १४–१५ वयोगटातील सर्व मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण राबविणार

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पुण्यात एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम विषयक दोन दिवसीय चिंतन शिबिराचे केले यशस्वी आयोजन; शिबिरात नवोन्मेष, डिजिटल आरोग्य आणि सहकार्यावर आधारित प्रशासनावर भर

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा

कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन काढण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन

vishwatmaklokswamivarta

पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी