vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य पैशाची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा    – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण

आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य पैशाची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा    – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण

सातारा प्रतिनिधी: लोकसंख्येच्या निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्र वितरीत कर्यात येते. सदर तरतूदींनुसार सातारा जिल्ह्यामध्ये १ हजार १५२ आपले सरकार सेवा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.

आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील CSC-SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रचालकांकडून आणि CSC-SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविणेत आलेले आहे.

 अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दिनांक २१/०३/२०२५ होती. त्यानूसार एकूण २ हजार ३२ आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दाखल झालेले आहेत.

  आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. याबाबत कोणत्याही स्वरुपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यास जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत असेही उपजिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण..

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन   

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद‌्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

जालना येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

संपर्क, संवाद आणि समाधान या त्रिसूत्रीतून नागरिकांना तत्पर सेवा द्या — विभागीय आयुक्त जी.श्रीकांतमहसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी व गुणवंत पाल्यांचा गौरव