vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- वैध मापन शास्त्र अधिनियम – २००९ अन्वये कोणत्याही प्रकारच्या वजने मापांमध्ये अचुकता असणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे अप्रमाणित वजनमापे वापरुन व्यवहार करणे म्हणजे ‘मापात पाप’. असे केल्यास शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तरी प्रत्येक दुकानदार, पेट्रोलपंप चालक तसेच अन्य सेवा देणाऱ्या पुरवठादारांनी आपल्याकडील वजन मापे, तोलन उपकरणे आदी तपासून त्याची अचुकता पडताळणी करुन घ्यावी असे आवाहन उपनियंत्रक वैध मापन शास्त्र शिवहरी मुंडे यांनी केले आहे.

भारताच्या संसदेने वैध मापन शास्त्र अधिनियम – २००९ अंमलात आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून वैध मापन शास्त्र अधिकाऱ्या मार्फत या अधिनियमाची व त्याखालील विविध नियमांची अंमलबजावणी केली जाते. वजन मापांची अचूक पडताळणी व आवेष्टीत वस्तू नियमांची अंमलबजावणी हे या अधिकाऱ्यांचे प्रमुख काम आहे.

मापात पाप केल्यास शिक्षेची तरतूद

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या निरीक्षक, सहायक नियंत्रक कार्यालयाकडून प्रथम पडताळणी तसेच त्यानंतर मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन करुन न घेतलेली वजने मापे व्यवहारात किंवा संरक्षण यासाठी वापरणे हा वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ चे कलम ३३ नुसार शिक्षापात्र अपराध आहे. फेरपडताळणी न करता वजन माप वापरणे हा महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अमल) नियम २०११ च्या नियम १२ नुसार अपराध असून नियम २३ खाली शिक्षापात्र अपराध आहे. यासाठी अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच अवैध वजन मापे जप्त केली जातात व न्यायालयात खटला दाखल केला जातो.

वजन मापांची पडताळणी ग्राहकांचा अधिकार

तोलन व माप उपकरणे ही वापरामूळे व वातावरणाच्या बदलत्या स्थितीमूळे त्यात दोष निर्माण होण्यासाठी शक्यता असते. त्यामुळे नियमाने ठरविल्यानुसार या यंत्राचे नियमानुसार नियमित कॅलिब्रेशन व व्हेरिफिकेशन करुन घेणे बंधनकारक आहे. वजन मापांची पडताळणी केल्यामुळे त्यांची अचुकता योग्य आहे किंवा कसे यांची तपासणी केली जाते. तसेच पडताळणी नंतर अचुकता कायम आहे किंवा कसे याची दररोज तपासणी तोलन उपकरण वापरणाऱ्या व्यक्तीने करणे आवश्यक आहे. जर त्यात दोष उत्पन्न झाला असेल तर तसे संबंधित अधिकाऱ्यांना कळविले पाहिजे व ते अचूक करुन घेतले पाहिजेत. तोलन उपकरणाची अचुकता तपासण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. त्यासाठी उपकरणाच्या क्षमतेच्या एक दशांश एवढी प्रमाणित वजने व्यापाऱ्याने ठेवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास तो दंडात्मक अपराध आहे.

पेट्रोल पंपातून देण्यात येणार इंधन बरोबर मिळते का हे तपासून पाहणे हा ग्राहकाचा हक्क आहे व त्यासाठी उपरकणाच्या क्षमतेच्या एक दशांश एवढी प्रमाणित वजने व्यापाऱ्याने ठेवणे बंधनकारक आहे व तसे न केल्यास तो दंडात्मक अपराध आहे. पेट्रोल पंपातून देण्यात येणारे इंधन बरोबर मिळते का हे तपासून पाहणे हा ग्राहकाचा हक्क आहे व त्यासाठी प्रमाणित व अचुक असे पाच लिटरचे माप पंपावर ठेवणे बंधनकारक आहे. पेट्रोल पंपातून विक्री होणाऱ्या इंधनात साधारणपणे प्रत्येक पाच लिटरमागे २५ मिली एवढी त्रुटी कायद्याने ग्राह्य आहे.

 अशी कराल वजनमापांची पडताळणी,वजन मापांच्या पडताळणीसाठी राज्य शासनाच्या maitre (मैत्री) पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा आहे. GRAS या शासकीय पोर्टलवर पडताळणीचे शुल्क भरता येते. जिल्ह्यात अनेक दुरुस्ती परवानाधारकांना परवाने देण्यात आलेले असून त्यांच्या मार्फतही दुरुस्ती करुन वजने मापे पडताळणी शुल्क भरता येते व पडताळणीसाठी वजने मापे सादर करता येतात. परवानाधारक उत्पादक, विक्रेते व दुरुस्तक यांचा तपशील vaidhmapan पोर्टलवर उपलब्ध आहे. परवानाधारकामार्फत पडताळणी करावयाची असल्यास शुल्क भरुन पडताळणी करेपर्यंत व प्रमाणपत्र तयार होईपर्यंत व्यापाऱ्यांनी पाठपुरावा करावा. पडताळणी बाबत कोणतेही अडचण अथवा तक्रार असल्यास किंवा वजन मापात फसवणूक होत असल्यास इतर कोणत्याही बाबीसाठी aclmaurangabadad@yahoo.in या मेलवर तक्रार पाठवावी किंवा शासनाच्या NCH हेल्पलाईनवर तक्रार पाठवावी किंवा ०२४०- २४८३८१८ या दुरध्वनीवर संपर्क साधवा,असे आवाहन उपनियंत्रक शिवहरी मुंढे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंग सांगली जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनानिमित्त ध्वजवंदन

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

vishwatmaklokswamivarta

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची