vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

 

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई यांचेकडून प्रत्येक जिल्हास्तरावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२५ करिता निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने जिल्हातील निवडणूक दि. ३ एप्रिल २०२५ रोजी लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.वी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील संबंधित मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी डॉक्टर्स हे मतदार असणार आहेत. बुलडाणा जिल्हयात एकूण २३११ मतदार आहेत. प्रत्येक मतदारास एकूण ९ (नऊ) मते देण्याचा अधिकार आहे. तसेच सदर निवडणूकीसाठी जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या लक्षात घेवून एकूण ५ मतदान केंद्र लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.बी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे ठेवण्यात आलेले आहेत. मतदान गुप्त पध्दतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम १९६७ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (पहिली सुधारणा) नियम २००२ मधील तरतूदीनुसार होईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाचीसांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे         

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी