vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

राष्ट्रविकासात अभियंत्यांचा सहभाग वाढवा वन नेशन वन अभियांत्रिकी सेवा नियम लागू करावा-इंडेफची मागणी. ३ एप्रिलला नवी दिल्ली येथे बैठक इंजि. के. एम. आय. सय्यद सरचिटणीस, इंडेफ यांनी दिली माहिती.

राष्ट्रविकासात अभियंत्यांचा सहभाग वाढवा वन नेशन वन अभियांत्रिकी सेवा नियम लागू करावा-इंडेफची मागणी. ३ एप्रिलला नवी दिल्ली येथे बैठक इंजि. के. एम. आय. सय्यद सरचिटणीस, इंडेफ यांनी दिली माहिती.

राज्य प्रतिनिधी -देशाच्या विकासात अभियांत्रिकी कामांना भारताच्या विकासासाठी अभियांत्रिकी विभागाचे योगदान उल्लेखनीय आहे. या संदर्भात सार्वजनिक अभियांत्रिकी, रस्ते बांधकाम, ईमारत बांधकाम, वाहतूक, कृषी जलस्रोत, पाटबंधारे, विद्युत, ऊर्जा ई. विभागाचे कार्य महत्वपूर्ण आहे. सध्या “विकसनशील भारत” सर्वांगीण विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असून भविष्यात विकसित भारत होण्याच्या दिशेने प्रगतीपथावर आहे.

अभियांत्रिकी विज्ञानाने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असे असूनही भारतात अभियांत्रिकी क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये तांत्रिक कामे करण्यासाठी वेगवेगळी कोड, मॅन्युअल नियमावली आहेत. एकाच राज्यात ही वेगवेगळ्या विभागात काम करण्याच्या पद्धतीतही फरक आहे. त्याच विभागातील अभियंत्यांच्या पायाभूत सुविधा आणि सेवा प्रगतीसाठी विविध तरतुदी आहेत. पुढच्या पिढीची प्रगती आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेत बदल करणे आवश्यक आहे.

इंडेफ (भारतीय अभियंता महासंघ) देशातील केंद्र आणि राज्य स्तरावरील ४२ अभियांत्रिकी सेवा संस्थांचे नोंदणीकृत व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरील अभियंता सदस्यांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे, गेली काही दशके, आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात, तांत्रिक क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या प्रगतीबरोबरच तांत्रिक कामाच्या अंमलबजावणीसाठी नियम, कार्यपद्धती आणि तरतुदींमध्ये केलेल्या सुधारणा, तंत्रशिक्षणाचा प्रश्न आणि सेवाशर्तीमध्ये दुरुस्तीची गरज याकडेही सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न इंडेफ कडून केला जात आहे. या संदर्भात, दि. ३ एप्रिल २०२५ रोजी इंडेफच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची नवी दिल्ली येथे बैठक आयोजीत करण्यात आली आहे, या बैठकीत खालील मुद्द्‌यांवर चर्चा केली जाईल:-1) भारतीय अभियांत्रिकी सेवेला अखिल भारतीय सेवा म्हणून अधिसूचित करावे. १९६७ मध्ये संसदेने तसा ठराव केला आहे पुढे २०१० मध्ये पुंछी आयोगाने देखील आग्रही शिफारस केली आहे.II) एक राष्ट्र एक अभियांत्रिकी सेवा नियमाची आखणी करावी.III) तांत्रिक अभियांत्रिकी विभागांमध्ये सर्वोच्च पदांवर अभियंत्यांचीच नियुक्ती करावी.V) राष्ट्रीय अभियांत्रिकी आयोगाची स्थापना करावी.

इंडेफची राष्ट्र विकासातील अभियंत्यांचा सहभाग, वाढविणारी भूमिका माननीय श्री. नितीन गडकरी, माननीय श्री सी. आर पाटील, माननीय श्री. मनोहरलाल खट्टर यांना अवगत करण्यात येणार आहे. या मोहिमेत इंडेफचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. एस. अनंत, उपाध्यक्ष इंजि. अविनाश राऊळ, तसेच ज्येष्ठ अभियंते इंजि. सी. देबनाथ, इंजि. एम. नागराज आणि इंजि. सुभाष चांदसुरे यांच्यासह देशाच्या विविध भागांतील कार्यकारिणी सदस्यही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित पोस्ट

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारींचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश**नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश; एसडीआरएफ पथके तैनात*

भोजापूर प्रकल्पाचा नदीजोडमधील समावेशासाठी आराखडा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ११ वंचित गावांसाठी सर्वेक्षणाचे आदेश

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा -पालकमंत्री नितेश राणे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज उरणमध्ये**नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे*

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणाचे नवे पाऊल: मिशन वात्सल्य योजना