vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आरोग्य विभागातील ७ आरोग्य सहाय्यक यांना आरोग्य सेवक या पदोन्नतीचा लाभ

आरोग्य विभागातील ७ आरोग्य सहाय्यक यांना आरोग्य सेवक या पदोन्नतीचा लाभ

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ७ कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आरोग्य सहायक (पुरुष) या पदाचे पदोन्नती आदेश आज, दि. ४ एप्रिल, २०२४ रोजी देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सभागृहात पदोन्नती आदेश देताना कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आरोग्य सहाय्यक पुरुष यांचे रिक्त पदांवर आरोग्य सेवक पुरुष संवर्गाच्या सेवा ज्येष्ठता यादीच्या अनुषंगाने ०७ आरोग्य सहाय्यक यांना पदोन्नती देण्यात आली. आरोग्य सहाय्यकांपैकी दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.

 यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर देवरे यांनी सर्व यंत्रणेचे यावेळी आभार मानले.

000

संबंधित पोस्ट

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन चांगलं खा;चांगलं व्हा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

कर्करोग तपासणी, जनजागृती मोहीम वेळोवेळी राबवा- जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हाधिकारी कार्यालयात मौखिक कर्करोग जनजागृती अभियान

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे“कर्करोग तपासणी वाहन लोकार्पण सोहळा”

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता- 67 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला मलेरिया – डेंग्यू प्रतिबंधात्मक जाहीर शिबीरांचा लाभ