vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
राज्य कामगार विमा योजनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. या वेळी वैद्यकीय संचालक डॉ. शशी कोळूणूरकर, संचालक (प्रशासन) सोहम वायाळ, उपसंचालक सचिन देसाई तसेच राज्यातील विविध राज्य विमा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था व शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. याचबरोबर रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी नवीन योजना तयार कराव्यात. शासनाकडून साहित्य व यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रिक्त पदे भरण्यासाठीही तातडीने कार्यवाही केली जाईल तसेच डायलिसिससारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व जलदगतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. कामगारांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी शोधून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात याव्यात व जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत.
एक महिन्यानंतर या सूचनांचा पुन्हा आढावा घेतला जाईल. कामात प्रगती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात.
0000००

संबंधित पोस्ट

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील मोदीज् मिशन’ या सुप्रसिद्ध वकील बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्या राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार. 

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीय महामंडळाकडून 50 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाखांचे बिनव्याजी कर्ज वाटपाच्या प्रस्तावास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…