vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

*मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

 

जालना (प्रतिनिधी) : – महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात, याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना प्रवास मोफत असणार आहे.

याच योजनेअंतर्गत निवड केलेले जालना जिल्हयातील जवळपास 800 लाभार्थी (राम भक्त)  जालना रेल्वे स्थानकातून संध्याकाळी 7.00 वा प्रवासा करिता रवाना झाले आहेत, भक्तांच्या या सुखकर प्रवासासाठी माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ.नारायण कुचे, बद्रीनाथ पठाडे, राजेश राऊत, सतीश जाधव, अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, शशिकांत घुगे, धनराज काबलीये, सुनील आरदड, स्टेशन प्रबंधक विनोद भारती, समाज कल्याण अधिकारी गीता कुटे आदींची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢

गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन· शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून बालकलावंतांचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात प्रत्यक्ष कृतीतून पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगला होळी उत्सव

जिल्ह्यातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत    –खासदार सुनिल तटकरे

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे