vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कायद्याचा धाक, प्रबोधनामुळे अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांना आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीत घेतला आढावा..

कायद्याचा धाक, प्रबोधनामुळे अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांना आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीत घेतला आढावा..

सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांचा व्यवसाय करणे फायद्याचे नाही, असा संदेश त्या तस्करांपर्यंत जावा, असा संकल्प करून सुमारे दोन महिन्यांपूर्वी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने कामाची सुरवात केली होती. त्या संकल्पसिद्धीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात कायद्याचा धाक, प्रबोधन या दोन्ही आघाड्यांवर कार्यवाही केल्याने जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांना आळा बसला असून, संबंधित सर्व विभागांनी यापुढेही परस्पर समन्वयाने अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढून जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी नियमित कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  येथे दिले.

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

अमली पदार्थ तस्करीविरोधात गत दोन महिन्यात केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने समाधान व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गत दोन महिन्यात पोलीस विभागाने अमली पदार्थ विरोधात 30 कारवाया केल्या असून, 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हे व अमली पदार्थ विषयक गुन्हे नियंत्रणात आले आहेत. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनाधीनांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन उपचार केंद्र अशा सर्व आघाड्यांवर सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याचा ध्यास घेतला असून सर्व यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनीही तंबाखूमुक्त शाळा प्रमाणे अमली पदार्थविरोधी प्रबोधनासाठी विविध उपक्रम आयोजित करावेत, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक लघुचित्रफीत, जिंगल, पोस्टर, निबंध आदि विविध स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धक, त्याचे कुटुंबिय व संबंधित व्यक्तिंना प्रेरणा मिळाली आहे. यातील विजेत्यांच्या लघुचित्रफीत, जिंगल, पोस्टर, निबंध यांना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सामाजिक माध्यमांवर व्यापक प्रसिद्धी द्यावी. तसेच अमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण 1 मे रोजी स्वतंत्र कार्यक्रम घेऊन करण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप

घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पूर्वतयारी बैठकआरोग्य, स्वच्छता, सुरक्षा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*  

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन