vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*  

सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*

सातारा, प्रतिनिधी :- सोळशी प्रकल्पांतर्गत सुमारे एक किलोमीटर लांबीच्या आणि साडेपाच टीएमसी क्षमता असलेल्या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मनातील विविध शंका आणि अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित केली जावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी सोळशी प्रकल्पाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. या आढावा बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखली पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसपंदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या कामामुळे संवरवाडी परिसरातील पुनर्वसनाचा प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊन फेरसर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. प्रांतअधिकारी आणि तहसीलदार यांनी या सर्व प्रक्रियेचा सतत पाठपुरावा करावा, असे आदेशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

  फेरसर्वेक्षण आणि पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने संरक्षण भिंत उभारण्यात यावी. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळा;आज जालना येथील कार्यालयांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ

प्रभावी प्रशासनात नागरिकांशी सुसंवाद महत्वाचा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी   

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील