vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामागारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते. त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबविते. बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी ९० दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधीत काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज दिले.

 मंत्रालयात ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए कुंदन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.

  कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले, ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडाळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. गावपातळीवर ग्रामविकास विभागाने २०१७ मध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक ९० दिवसाचे प्रमाणपत्र देतो. मात्र सध्या ग्रामसेवकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते. ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशीत करावे.

बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी. मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविण्यात यावी. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार आहेत, मात्र नोंदणीअभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्र शेवटच्या बांधकाम कामगाराला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजे, अशा सूचनाही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार,राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री

vishwatmaklokswamivarta

किआने भारतात सादर केली प्रीमियम 7-सीटरची लक्झरी एस यु व्ही सिरोस- लॉन्च केली आहे पुढील वर्षी जानेवारी 2025 पासून त्याची बुकिंग सुरू…

vishwatmaklokswamivarta

महादेव बेटिंग ॲप प्रकरण: अभिनेता साहिल खान फरार;

पंचायत समिती कल्याण येथे जागतिक महिला दिन साजरा**महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न* 

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता: महर्षि वाल्मिकी जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

vishwatmaklokswamivarta