vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार..

पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार..

मुंबई, प्रतिनिधी : पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

 ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृती बंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, असे एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतिक्षायादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे. ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास श्रीमती मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट घरी अज्ञात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चौकशी सुरू…

खतटंचाईचा मुद्दा गंभीर, कृषी विभागाकडून दुर्लक्ष; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा…

ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेटआदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन