vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितींना दिली भेटब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी मार्फत ग्रामस्थांच्या अडचणीं सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार…

ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितींना दिली भेटब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी मार्फत ग्रामस्थांच्या अडचणीं सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार…

 

ठाणे प्रतिनिधी- नळ बरोबर बंद(जिल्हा परिषद, ठाणे)- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबविण्यात येत असतो त्याच धर्तीवर शासनाकडील मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्हा परिषदेत १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती स्तरावर तालुका सुविधा समिती योजना “Block Facilitation Committee” तयार करून आज, दि. ०९ एप्रिल, २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांनी पंचायत समिती कल्याण, मुरबाड, शहापूर येथे भेटी दिल्या.

   मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तर “तालुका सुविधा समिती योजना” (Block Facilitation Committee) कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांनी नेमलेले प्रतिनिधी पंचायत समिती मुरबाड, शहापुर, कल्याण येथे भेटी दिल्या आहेत तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी पंचायत समिती‌ मुरबाड, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी पंचायत समिती शहापूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी पंचायत समिती कल्याण येथे ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी निराकरण करण्यासाठी भेटी दिल्या आहेत.  या भेटी दरम्यान पंचायत समिती‌ मुरबाड 10 तक्रारी, पंचायत समिती शहापूर 03 तक्रारी, पंचायत समिती कल्याण 05 तक्रारी असे एकूण 18 तक्रारी, अडचणींचे निराकरण केले आहे.      तालुकांतर्गत विविध योजनांबाबत / पायाभूत सुविधांबाबत ग्रामस्थांच्या प्राप्त झालेल्या तक्रारी, जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांच्या लेखी तक्रारी बाबत, ग्रामस्तरावर औद्योगिक गुंतवणुक करणाऱ्या उद्योजकांच्या अडचणी निराकरण करणेकरिता त्यांच्याकडील प्राप्त निवेदन, व्यापारी व कामगार वर्गांच्या संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी इत्यादी सर्व प्रकारच्या अडचणींबाबत निराकरण करण्यात आले तसेच अर्जदाराला अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.

यावेळी तालुका स्तर तालुका सुविधा समिती योजना कार्यक्रमास गट विकास अधिकारी, पंचायत समिती हे या कार्यक्रमाचे सचिव व तालुकास्तरावरील विषयांशी निगडीत सबंधित तालुकास्तरावरील विभाग प्रमुख तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत – एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार..

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता दिंडी सोहळ्यात विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छतेचाही जागर

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..