vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही देशभरातील बौद्धांची न्याय्य मागणी आहे.त्यासाठी बिहार सरकार ने महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करावा आणि महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये सर्वच्या सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत या मागणी साठी येत्या दि.28 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबईत भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात मुंबई आणि ठाण्यातील सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने सामील होऊन बौद्धांची ताकद दाखवावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश च्या आयोजित बैठकीत ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी विचारमंचावर रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे; महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; प्रकाश मोरे; एम एस नंदा; विवेक पवार; महिला आणि युवक आघाडी चे प्रमुख पदाधिकारी आणि मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

गुढीपाडवा कसा साजरा करावा: परंपरा, विधी आणि आध्यात्मिक महत्त्व…

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन**पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृतीची आंदोलनाद्वारे मागणी !

vishwatmaklokswamivarta

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा