vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

 

 सांगली प्रतिनिधी:- आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कडेगाव, पलूस, खानापूर व तासगाव तालुक्यातील एकूण 37 गावामध्ये आरफळ कालवा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता दि. 10 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे.

 या आदेशानुसार कडेगाव तालुक्यातील शेळकबाव, शिरगाव, वांगी व रामपूर, पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे, बांबवडे, सांडगेवाडी, पलूस व कुंडल, खानापूर तालुक्यातील भाळवणी, कमळापूर, आळसंद, तांदूळवाडी, वाझर व बलवडी, तासगाव तालुक्यातील निंबळक, चिखलगोठण, आळते, बोरगाव, लिंब, विसापूर, पानमळेवाडी, शिरगाव (वि), ढवळी, तासगाव, चिंचणी, वासुंबे, कवठेएकंद, बेंद्री, शिरगाव (क), नागाव कवठे, कुमठे, निमणी, येळावी, राजापूर, तुरची या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर दि. 10 एप्रिल 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 मे 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.

 हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ९ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• परीक्षेच्या पूर्वतयारी, सज्जतेचा आढावा• प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त; वैद्यकीय पथके तैनात• सीसीटीव्ही कार्यान्वित; ड्युटी मॅजिस्ट्रेट व स्टेट ऑब्झर्वर यांची नियुक्ती

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक  

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta