vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट,यानंतर मराठी पत्रव्यवहाराला मराठीतून उत्तर

संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट,यानंतर मराठी पत्रव्यवहाराला मराठीतून उत्तर

     मुंबई, प्रतिनिधी- संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली व समितीच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली.देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे व हिंदी भाषेला ‘सहयोगी भाषा’ म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे निमंत्रक डॉ दिनेश शर्मा यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज आज हिंदी भाषेत होत असून यानंतर मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल, तामिळ भाषेतील पत्रांना तामिळ भाषेतूनच उत्तर दिले जाईल, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.

आज तामिळनाडू मध्ये परिस्थिती बदलली आहे. बहुतांशी लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये पाठवत असून त्या शाळांमध्ये हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते. त्यामुळे आज अनेक मुले उत्तम हिंदी समजतात व बोलू शकतात असे राज्यपालांनी सांगितले.आपण झारखंड येथे राज्यपाल असताना हिंदीशिवाय लोकांशी संवाद साधता येत नव्हता. आज आपल्याला हिंदी पूर्ण समजते असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण विद्यापीठांमध्ये जर्मन, जपानी, मँडरिन, आदी विदेशी भाषा देखील शिकविल्या जाव्या अश्या सूचना विद्यापीठांना केल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी समितीचे सदस्य खा. रामचंद्र जांगडा (हरियाणा), खा. राजेश वर्मा (बिहार), खा. कृतिदेवी देवबर्मन (त्रिपुरा), खा. किशोरीलाल शर्मा (उत्तर प्रदेश), खा. सतपाल ब्रह्मचारी (हरियाणा), खा, डॉ अजित गोपछडे (महाराष्ट्र), खा. विश्वेश्वर हेगडे (कर्नाटक) तसेच अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

हसूल सप्ताहनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न  · जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला परतुर शहरातील विविध विभागांचा आढावा..

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर यांच्या विचार, कार्यावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे शुक्रवारी बक्षीस वितरण…

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक