vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ,रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ,रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.

सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

00000000

संबंधित पोस्ट

डिफेन्स क्लस्टर तयार करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण सामुग्री उत्पादनांसाठी आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह- छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना संरक्षण मंत्र्यांचे निमंत्रण…

नागरिकांनी उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!२२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे

शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतसहभागी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अनिवार्य..