vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन

 

            सांगली, प्रतिनिधी: कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या म्हैसाळ येथील चार महिलांच्या कुटुंबियांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हैसाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन एकत्रित सांत्वन केले.

    यावेळी मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, दीपक शिंदे-म्हैसाळकर, सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर, दुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर यांच्यासह चारही मृत महिलांचे कुटुंबिय उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात मजुरीसाठी गेलेल्या म्हैसाळ येथील रेखा कांबळे, भारती कांबळे, कांचन कांबळे व राणी वडर या महिलांचा दिनांक 13 एप्रिल रोजी कुची येथे झालेल्या अपघातामुळे मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला.    या कुटुंबियांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मिरज तहसीलदार यांनी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांचा वैद्यकीय खर्चही देण्याचे त्यांनी आश्वासित केले. तसेच मृत महिलेच्या लहान मुलांना त्यांच्या शिक्षण, पालन, पोषणासाठी आवश्यक मदत करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  यावेळी नाना कांबळे, अशोक वडर, ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी- केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात प्रकरणी खासदार डॉ. कल्याण काळे यांची ठोस भूमिका – दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, पीडितांना मोठ्या आर्थिक मदतीची मागणी

गडचिरोली पॅटर्न: ‘घाटो कट्टा’च्या माध्यमातून महिला होणार आत्मनिर्भर; सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे लोकार्पण

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन