vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विविध योजनांद्वारे करावयाची जलसंधारणाची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून विहित वेळेत पूर्ण करावी. जेणेकरुन पावसाळ्यात पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळीत वाढ झाली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

 जलसंधारण उपचारांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, जिल्हा जलसंधारण अधिकारी विजय कांबळे, सामाजिक वनिकरण विभागाचे एस.बी. फुले तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते.

 जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, लघुसिंचन योजनांची ७ वी व जलसाठ्यांची २ री प्रगणना, १०० दिवसीय कृती आराखडा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

 बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार २.० अंतर्गत सुधारीत गाव आराखड्यानुसार २६४३ कामे घेण्यात आली आहेत. त्यतील १८७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६३४ कामे ही अभिसरणातून करण्यात येत आहेत. १७८८ कामे पुर्ण असून २१८ कामे प्रत्यक्ष सुरु आहेत. त्याच प्रमाणे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४० ठिकाणी कामे सुरु असून २५ लक्ष ५५ हजार घनमिटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. या कामासाठी ग्रामस्थांकडून अजून मागणी वाढत आहे. त्यानुसार त्या कामांचा समावेश करण्यात येत आहे,असे यावेळी सांगण्यात आले.

 जिल्ह्यातील साठ्यांच्या प्रगणनेच्या कामालाही गती द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामीयांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, अशा प्रकारे प्रगणना करणऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यात विविध ठिकाणी होत असलेले जल व मृद संधारण उपचारांचे काम करतांना त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. वेळेत ही कामे पूर्ण करावी. जेणे करुन येत्या पावसाळ्याच्या पहिल्या पावसापासून पाणी जिरवता आले पाहिजे.

०००००

संबंधित पोस्ट

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

ग्लोबल चित्रपट निर्मितीसाठी ‘इंडिया सिने हब पोर्टल’चा वापर करण्याचा केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह; दुर्लक्षित भागात कमी खर्चातील चित्रपटगृहांच्या विकासासाठी रोडमॅपही सादर

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शना’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

पासपोर्ट अर्जदारांसाठी पुण्यात 8 एप्रिलला जनसंवाद सत्र