vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे…

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे…

मुंबई, प्रतिनिधी: पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे तिकिट कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल.

रेल्वे क्रमांक : 04612

प्रस्थान स्थानक : श्री माता वैष्णो देवी कटरा

प्रस्थान वेळा :कटरा – रात्री 21:20

उधमपूर – रात्री 21:48

जम्मू – रात्री 23:00

ही विशेष रेल्वे अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यात आणि नवी दिल्लीकडे सुरक्षित व आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रामबन येथे राष्ट्रीय महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. काश्मीर व जम्मू येथे अडकलेले प्रवाशी या विशेष रेल्वेने प्रवास करु शकतात. ही रेल्वे सकाळी 09:30 वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.

प्रशासन सर्व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता..

मोठी बातमी- जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोन जणांना एनआयएकडून अटक

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प   – राज्यपाल जिष्णू देव वर्माखारघर येथील इस्कॉन मंदिरात ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चा शुभारंभ .

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी आघाडयांकडून मोर्चेबांधणीला वेग, बैठकांचं सत्र सुरु

vishwatmaklokswamivarta

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान 

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू