vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, प्रतिनिधी:- जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बाधित नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (मंत्रालय नियंत्रण कक्ष) येथील कक्षात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.

मंत्रालय नियंत्रण कक्षात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सुर्यवंशी व कक्ष अधिकारी नितीन मसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी मदतीकरिता मंत्रालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९०/२२७९४२२९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९३२१५८७१४३ (वॉट्सअप क्रमांक) तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक (टोल फ्री १०७०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री.खडके यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणेमार्फत“मास्टर ट्रेनर्स” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

विधान परिषद प्रश्नोत्तर :नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीचीप्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपूर्वी अर्जाचे आवाहन

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन