vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वेबसाईट बंद असल्याने नवीन, जुने रेशनकार्ड मिळत नसल्याने-काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना एका निवादानाद्वारे सुरू करण्याची मागणी केली आहे.

वेबसाईट बंद असल्याने नवीन, जुने रेशनकार्ड मिळत नसल्याने-काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना एका निवादानाद्वारे सुरू करण्याची मागणी केली आहे.

 

औरंगाबाद प्रतिनिधी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी उप जिल्हाधिकारी संगीता राठोड यांना निदर्शनास आणुन देण्यात आले की, आरसीएमएस ही वेबसाईट मागील एक ते दिड महिन्यांपासून बंद असल्याने रेशनकार्डबाबतचे काम ठप्प झाले आहे. नागरिक विविध कामांसाठी तहसील कार्यालय, अन्नधान्य वितरण विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र, कोणतेही काम होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत.

जुने असणारे रेशन कार्ड ऑनलाइन करून घेण्यासाठी आग्रह धरण्यात आला. त्यानुसार बहुतांश नागरिकांनी याची अंमलबजावणी करत १२ अंकी क्रमांक मिळविला आहे. तर शिल्लक असणारे कार्ड ऑनलाइन करून घेण्यात येत आहेत. दरम्यान रेशन कार्डबाबत सर्व प्रकारची ऑनलाइन प्रक्रिया ही रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम (आरसीएमएस) या वेबसाईटवर करण्यात येते. यामध्ये नवीन कार्ड तयार करणे, जुन्या कार्डमध्ये नावे वाढविणे किंवा कमी करणे, नावात बदल करणे, कार्ड बंद करणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मात्र, मागील एक ते दिड महिन्यांपासून ही बेबसाईटच बंद आहे. त्यामुळे संबंधित सर्वच कामे खोळंबली आहेत. याबाबत ओरड झाल्यानंतर थोडी दुरुस्ती करण्यात आली. एक ते दोन महिने साईट चालली. त्यानंतर पुन्हा बंद पडली. मागील चार ते पाच महिन्यांपासून हाच खेळ सुरू असल्याने नागरिक तहसील कार्यालय, अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय अशा ठिकाणी खेट्या मारून वैतागले आहेत. वेबसाईट बंद आहे एवढेच उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे. कधी चालू होईल, याबाबत त्यांनीही माहिती नसल्याने नागरिकांच्या प्रश्नावर ते निरुत्तर होत आहेत. गोरगरीब जनतेला आरोग्य योजनेचा व इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अत्यंत आवश्यक आहे.

उपजिल्हाधिकारी संगीता राठोड सदरील निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन रेशनकार्ड ऑनलाईन वेबसाईट तात्काळ कायमस्वरुपी चालु करण्यासाठी संबंधितास आदेशित करावे जेणेकरुन जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार नाही अशी मागणी सय्यद अश्फाक अली, शेख फरहान यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दाखले वितरण

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १०० टक्के कामकाज पूर्ण

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध

कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आऱ. पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती