vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता राज्यशासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 6 महिनेवरुन 11 महिने करणेस शासनाने मान्यता प्रदान केली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रक्षिणार्थींनी पुढील पाच महिण्यासाठी संबंधित आस्थापनेत रुजू व्हायचे आहे. या वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाटी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांनी त्यांची आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवासी प्रमाणपत्र व जन्म दाखला प्रमाणपत्र इ. पडताळणी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी.

योजनेअंतर्गत ज्या उमेदवाराचा 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत दि.30 एप्रिल 2025 पर्यंत रुजू व्हावे तसेच संबंधित आस्थापनांनी कार्य प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करुन घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे१० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

योजनेसाठी जमीन खऱेदी करणार : समाजकल्याण कार्यालय जमीनविक्रीस इच्छूकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकां दर सोमवारीक्रीडा संकुल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक ! सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर !… हा तर सत्याचा विजय – सनातन संस्था