vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार – आयुक्त नयना गुंडे यांची माहिती

बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार – आयुक्त नयना गुंडे यांची माहिती

मुंबई प्रतिनिधी-

राज्यातील काही भागांमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृह, वसतिगृह आणि अनाथाश्रमांविरोधात महिला व बालविकास विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा अनधिकृत संस्थांवर एक वर्ष कारावास अथवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे.

अनधिकृतपणे संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. कलम 42 नुसार, कोणत्याही संस्थेला नोंदणी प्रमाणपत्राशिवाय बालकांची देखभाल करण्याची परवानगी नाही. अशा संस्थांचे संचालन करणाऱ्यांवर एक वर्षाचा कारावास किंवा किमान एक लाख रुपयांचा दंड, किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे, असे आयुक्त गुंडे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात अशी अनधिकृत बालक संस्था आढळल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अथवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. बालकांवरील शोषण रोखण्यासाठी समाजाने सजग राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्त गुंडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षा प्रक्रिया दोन्ही दिवशी सुव्यवस्थितरित्या संपन्न 

मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी.

राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित-नव्या नवेली नंदा, मोना सिंग, जेनेलिया देशमुख सन्मानित

शिवडी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने एका गर्भवती महिलेचा जीव वाचवला आणि तिला सुरक्षित प्रसूतीसाठी मदत केली. या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस सह-आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी यांनी निर्भया पथकाचे अभिनंदन केले.

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती,गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.

vishwatmaklokswamivarta