vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीराचा शुभारंभ…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीराचा शुभारंभ…

 

सांगली, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत मिरज येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील सुसंवाद शिबिरामार्फत जास्तीत जास्त खातेदार यांनी शासनाकडील प्रलंबित भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.

उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १ व तहसीलदार मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय मिरज येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १ तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता लष्करे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. खोत आणि त्यांचे सहकारी आदि उपस्थित होते.

मिरज तालुक्यातील सन २०१५ पासून म्हैसाळ प्रकल्प कॅनॉल मध्ये भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला रक्कम अद्याप न घेतलेल्या बेळंकी येथील ८१ खातेदार तसेच सांबरवाडी येथील ५८ खातेदार यांना भूसंपादन सुसंवाद शिबिरात बोलावण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सन २०१५ पासून भूसंपादित जमिनीची मोबदला रक्कम संबंधित खातेदार यांनी न स्वीकारण्याचे कारण, त्यावर ही रक्कम सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून कशाप्रकारे संबंधित खातेदार यांना देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अशी शिबीरे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात घेण्यात येणार असून संबंधित खातेदारांनी कागदपत्राची पूर्तता करून भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारावी, असे ते म्हणाले.

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे यांनी या शिबिराबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १ तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली.

शुभारंभाच्या दिवशी बेळंकी येथील तीन प्रकरणी तसेच सांबरवाडी येथील दोन प्रकरणात संबंधित खातेदार यांनी आवश्यक स्वयंघोषणापत्र देऊन भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) स्नेहल कनिचे यांनी केले. आभार मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी मानले. या कार्यक्रमास संबंधित गावचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संबंधित खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

नवी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबरला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या iBRICS परिषदेचं आयोजन 

vishwatmaklokswamivarta

मुंबईत उपनगरासह रिमझिम पाऊस सुरू झाला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणार-वनमंत्री गणेश नाईक

जनसंवाद कार्यक्रमात विविध विषयांवर निवेदने प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

vishwatmaklokswamivarta

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत,फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा..

गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख**‘कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम*

vishwatmaklokswamivarta